Mobile Update

🔴HOW TO UPDATE YOUR MOBILE?🔴

चला आज आपला मोबाईल अपडेट करूया.

अपडेट विषयी थोडे जाणून घेऊया.
🔶अपडेट मध्ये दोन प्रकार आहेत.

1. मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट

2. मोबाईल एप्स अपडेट

🔮प्रथम मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट कसे कराल?

🔷मोबाईल मध्ये बरेच os (operating system) andriod व्हर्जन आहेत. उदा - जेलिबिन, आइस कँडी, किटकॅट, लॉली पॉप.
मोबाईल कंपनी नवीन व्हर्जन लाँच करून ऑनलाइन लिंक पब्लिश करते आणि आपला मोबाईल ऑनलाइन असेल तर सॉफ्टवेअर अपडेट असा मेसेज येतो. सॉफ्टवेअर अपडेट वर क्लिक करून अपडेट डाउनलोड करून घ्या. डाउनलोड साठी wifi default सेटिंग असते. Wifi असेल तर लगेच डाउनलोड होईल. नसेल तर सेटिंग मध्ये मोबाईल डेटा वापरून डाउनलोड करा. डाउनलोड पूर्ण झाल्यावर reboot असा मेसेज येईल ok करा. मोबाईल रिस्टार्ट होईल व सॉफ्टवेअर इंस्टॉल होईल. काहींचे मोबाईल reboot विचारणार नाही. त्यासाठी आपणच restart करून Menu, switch key व volume up key तिन्ही बॅटन दाबून धरा. Volume up/down key चा उपयोग करून डाउनलोड केलीली file select करून अपडेट करावे लागेल.  प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमचा मोबाईल अपडेट होईल. अपडेट कसे ओळखावे. अपडेट करण्यापूर्वी आपल्या मोबाईलचे व्हर्जन पहा.

Mobile setting
          ⬇
About device
          ⬇
Andriod version

Andriod version मध्ये अंक पाहा.

उदा- 4.4.1 असेल तर अपडेट नंतर 4.4.2 असे दिसून येईल.

🔮आता मोबाईल मधील एप्स कसे अपडेट करावे?

🔷मोबाईल एप्सच्या बाबत असेच आहे ज्या वेळेस एप्स मध्ये बदल होईल ऑनलाइन असेल तर त्या वेळेस एप्स अपडेट मागतो. अपडेट डाउनलोड साठी wifi default सेटिंग असते. Wifi असेल तर लगेच अपडेट होईल. नसेल तर सेटिंग मध्ये मोबाईल डेटा वापरून अपडेट करा.

अपडेटसाठी मोबाईल एप्समध्ये playstore नावाचे apps आहे. Playstore apps साठी gmail लॉगिन आवश्यक आहे. नसेल तर gmail तयार करून लॉगिन व्हा.
Playstore मध्ये डाव्या बाजूला तीन रेषा वर टच केल्यास My apps and games दिसेल त्या त्यावर टच केल्यास installed and All असे दोन ऑप्शन दिसतील तर installed वर टच केल्यास आपल्या मोबाईल मधील सर्व एप्सची यादी दिसते. एप्स समोर अपडेट किंवा अपडेटेड असे ऑप्शन दिसतील. तुम्ही पाहिजे त्या एप्सला अपडेट करू शकता किंवा अपडेट ऑल असे ही करू शकता.
अशा प्रकारे आपल्या मोबईल मधील soft/ apps अपडेट करून घ्या. व इंटरनेटच्या साह्याने पुढे पुढे राहा.

No comments:

Post a Comment